Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

कॉलेज शिकण्यापेक्षा कॉलेज लाईफ जगा---- धैर्यशील मोहिते पाटील.

 


अकलूज ---प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

                             श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट संचलित ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये बीसीए व बीएससी ई सी स मधील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी वेलकम फंक्शनचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

          प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक प्रवासाला सुरुवात होत आहे हा शैक्षणिक प्रवास चांगल्या होण्यासाठी सीनियर विद्यार्थी व जुनियर विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद असणे खूप आवश्यक आहे याचे महत्त्व ओळखून वेलकम फंक्शनचे आयोजन दरवर्षी महाविद्यालयात करण्यात येते. 

         महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्ष बोलताना पुढे म्हणाले की,महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती बरोबर कला ,क्रीडा , सांस्कृतिक स्पर्धांमध्ये व कार्यक्रमांमध्ये उत्साह पूर्ण सहभाग नोंदवावा यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास प्रेरणा मिळते.

तसेच शिक्षणाबरोबर महाविद्यालयीन आयुष्यामध्ये प्रगती सोबत विविध गोष्टींचा आनंद घ्यावा सर्व स्पर्धांमध्ये उत्साह पूर्ण सहभाग नोंदवत असताना आजचे युग कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजीचे आहे रोज नवीन नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे आव्हान आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर येत आहेत विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून संगणक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या नोकरी व व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत त्याची सर्व माहिती घेऊन त्या प्रगतीपथावर चालण्यासाठी त्या आत्मसात कराव्यात असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले

               महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस यु शिंदे प्रास्ताविकामध्ये म्हणाले सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन घ्या व त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घ्या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या विविध सोयी सुविधांविषयी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. जास्तीत जास्त पुस्तके वाचून आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. समाजासाठी आपण देणं लागतो या भावनेने सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक कार्यामध्ये देखील सहभाग नोंदवा.



        या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्ण सहभाग नोंदवला. या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयीन विकास समिती सदस्य संजय राकले,मच्छिद्र पगारे,प्राचार्य डॉ.एस.यु.शिंदे शिवरत्न शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अश्रफ शेख,शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीचे प्राचार्य डॉ.अरविंद कुंभार,विविध विभागाचे विभाग प्रमुख डॉ. तुळशीराम पिसाळ,संजय साळुंखे,बाळासाहेब क्षीरसागर विद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.गायत्री देशमुख व ऋतुजा फलटणकर हिने केले व आभार खुशी नवगन हिने मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा