Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

जिजामाता कन्या प्रशालेत " "महाभोंडला" कार्यक्रम संपन्न .

 


अकलूज ---प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

                           अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिजामाता कन्या प्रशाला येथे नेत्रदीप महाभोंडला कार्यक्रम जल्लोषामध्ये संपन्न झाला.



           अकलूजमध्ये जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भोंडल्याचा नेत्रदिपक सांस्कृतिक सोहळा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या महाभोंडला कार्यक्रमात प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.  


   

         हस्त नक्षत्राच्या आगमनाचा प्रतीक म्हणून हा सण हिंदू धर्मशास्त्रमध्ये विशेष करून महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये फार महत्त्वपूर्ण मानला जातो हत्तीची पूजा त्या भोवती सर्व महिलांनी आणि विद्यार्थिनींनी फेर धरून भोंडल्याच्या पारंपारिक गीत म्हणाले जाते हा भोंडल्याचा कार्यक्रमाचे खरं पारंपारिक सणाची साक्ष देणाराच असतो जिजामाता कन्याप्रशालेत फेर धरला याप्रसंगी पारंपारिक खेळामध्ये काटवट कणा,झिम्मा फुगडी,लाठी काठी, फुगडी या सगळ्या खेळांनी सादरीकरण झाले व गरबासुद्धा खेळण्यात आल्या प्रशालेतील सांस्कृतिक विभागाच्या सर्व शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका सौ.सुनीता वाघ स्वतः या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या प्रशाला समितीच्या सदस्या यांनी सुद्धा सहभागी होऊन कार्यक्रमाची उंची वाढवली विद्यार्थिनींनी अत्यंत निरागसपणे या कार्यक्रमाचा आनंद लुटला कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षिका यांनी विशेष परिश्रम.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा