संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
होऊ द्या चर्चा.. अभियानाच्या निमित्ताने तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब धाराशिवचे लाडके लोकप्रिय आणि एकनिष्ठ आमदार, आमचे आधारवड आ. कैलास दादा पाटील यांनी शहापूरकरांसोबत संवाद साधला.
यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या पीक विमा, कांदा अनुदान, वाढलेली महागाई, वाढलेले पेट्रोल-डिझेल, गॅसचे भाव पण त्याप्रमाणात कमी झालेले शेतमालाचे भाव, अतिवृष्टी व सततच्या पावसाची नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न होणे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांची नावे कमी करणे, फसवी कर्जमाफी योजना, अच्छे दिन यासारखी पोकळ आश्वासन व बोलघेवड्या योजनांची भांडाफोड केली.
यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, उपतालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर, धाराशिव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक रवी वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, शंकर जमादार, सोमनाथ गुड्डे, पंकज पाटील, विकास सुरवसे, शाखाप्रमुख बाबा जाधव, किरण काळे, नितीन जाधव, सचिन मोरे, विकास सुरवसे,गंगासागर पवार, दादा जाधव, विनोद काळे, स्वामी कुंभार, शिवानंद कोळी यांच्यासह ग्रामस्थ, शिवसैनिक मंडळी उपस्थित होते. आ.कैलास दादा पाटील यांनी वेळात वेळ काढून शहापूरकरांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा