गणेशगाव--- प्रतिनिधी
नुरजहाँ शेख,
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील शहीद इन्स्पेक्टर निवृत्ती जाधव यांचा चौदावा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी त्यांच्या स्मारकावरती साजरा करण्यात आला.
शहीद निवृत्ती जाधव यांचा स्मृतिदिनी विविध उपक्रमांनी साजरा सलामी,श्रद्धांजली, वृक्षारोपण,पुरस्कार वितरण, शहीद जवान ज्योत,पदयात्रा, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असे उपक्रमाने साजरी करण्यात आली.
सकाळी शहीद जवान ज्योत काढून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची भव्य अशी रॅली काढण्यात आली.त्यांच्या वीरपत्नीने बांधलेल्या स्मारकावरील पुतळ्याला मान्यवरांनी सलामी देऊन श्रद्धांजली वाहिली.यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले.पोलीस प्रशासनामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल अकलूज पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सुरवसे मॅडम यांना शहीद निवृत्ती जाधव स्मृती गौरव पुरस्कार शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वीरपत्नी सुरेखा निवृत्ती जाधव यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
त्यावेळी आपल्या मनोगत व्यक्त करताना सुरवसे मॅडम यांनी शहीद निवृत्ती जाधव यांचे कार्य सर्व पिढीसाठी प्रेरणादायी आहे, त्यांचे नाव कायमस्वरूपी अमर राहणार आहे.असे मनोगत व्यक्त केले.अधटराव सरांनी शहीद निवृत्ती जाधव यांच्या कार्याचा आढावा मनोगतामधून सांगितला.
या कार्यक्रमासाठी अकलूज पोलीस स्टेशनच्या पीएसआय स्वाती सुरवसे, एएसआय बाळासाहेब पानसरे, नगराध्यक्ष लक्ष्मी चव्हाण,नगरसेविका तेजश्री लाटे, नगरसेविका जोशना सावंत-पाटील,नगरसेविका शारदाताई पाटील,जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर,गटनेते नगरसेवक राहुल रेडे,शिवाजी रेडे,पैलवान अशोक चव्हाण, नामदेव पाटील,मौला पठाण,चेअरमन राजेंद्र वाळेकर, विक्रम लाटे,मेजर नागनाथ हाके, चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग बनसोडे,नवनाथ अधटराव सर, सिताराम गुरव,सुनील गवळी,मुख्याध्यापिका सुरेखा अनिल जाधव,भागवत पारसे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय दोरगे,सचिव बाळासाहेब भोसले,भाग्यवंत नायकुडे, बाळासाहेब कामते,नागनाथ वाघमारे,माधव साठे,हेमंत पाटील,गणेश कचरे,पांडुरंग चव्हाण,अरविंद साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मेश जाधव,प्रेरणा जाधव,वीरपत्नी सुरेखा जाधव,रवींद्र नाईकनवरे,सारिका नाईकनवरे,सविता नाईकनवरे, कांचन देवडकर,अनिल शिंदे, स्वाती पारसे,दत्ता नाईकनवरे, शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा जाधव यांनी केले तर आभार सचिव सारिका नाईकनवरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा