Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष सुतार यांची बिनविरोध निवड

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                        - पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष हरिभाऊ सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान पांडुरंग बोडके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत संतोष सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सौ. भाग्यश्री बोडके यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी काम पाहिले.



    माजी सरपंच ज्योती बोडके, माजी उपसरपंच पांडुरंग बोडके, ग्रामपंचायत सदस्य अनुराधा गायकवाड, सुनीता शेंडगे, ग्रामसेवक गणेश लंबाते यांच्या उपस्थितीत सदरची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी माजी सरपंच श्रीकांत बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, भागवत सुतार, नामदेव बोडके, सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके, सतीश बोडके, मारुती सुतार, पोपट बोडके, केशव बोडके, राजेंद्र सुतार, संजय सुतार, बाबासो गायकवाड, नंदू सुतार, चक्रधर सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी, शंकर रणदिवे, मयूर सुतार, पप्पू पडळकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



    उपसरपंच संतोष सुतार निवडी प्रसंगी म्हणाले, माझ्या कुटुंबाला लोकनेते महादेवराव बोडके दादा यांचा व आजोबा बाबूराव सुतार यांच्या आशीर्वादाने गावाची सेवा करण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे व माजी सरपंच श्रीकांत बोडके यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी बुद्रुक गावचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहे.



फोटो - पिंपरी बुद्रुकचे उपसरपंच संतोष सुतार.

---------------------------










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा