Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

अग्निवीर," अक्षय गवते" यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे १० लाखाची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

 


उपसंपादक---नुरजहाँ शेख 

टाइम्स 45 न्युज मराठी.

                              मुंबई, दि. २६ : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 


जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा