प्रतिनिधी-डी.एस. गायकवाड
मो.9890 153 330
-महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ज्येष्ठ नेते आहेत तसे सोलापूर जिल्ह्यात बबनदादा शिंदे देखील जेष्ठ आहेत मात्र ते अलीकडील काळात निरर्थक बडबड करत असताना आपल्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ठेका घेतला आहे काय? असे वक्तव्य केले आणि समस्त लढणाऱ्या मराठा बांधवांच्या भावना दुखावल्या... या अगोदर सुद्धा त्यांची इतर मागणी पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसली. समस्त महाराष्ट्र... मराठा बांधवांना आरक्षण हवे ही मागणी करत असताना आमदार बबनदादा मात्र विषय भरकटवू पाहत आहेत... ज्येष्ठ नेत्यांनी तोलून मापून बोलले पाहिजे त्यांच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व असते याचे भान आमदार बबनदादांना राहिलेले दिसत नाही. काही दिवसापूर्वी तर त्यांनी ते राष्ट्रवादीचे असताना आणि वरिष्ठ पातळीवर माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरलेला नसताना उगीच दोन लाखाच्या लीड च्या घोषणा केल्या... त्यांची ती राजकीय टिप्पणी असू शकते मात्र ते शक्य आहे का? लोकांना ते पचेल का? याचा त्यांनी जरासाही विचार केला नाही. आणि आता तर मराठा बांधवांनाच त्यांनी आव्हान दिल्यामुळे वेगळाच वाद यानिमित्ताने पुढे येताना दिसत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून मराठा आरक्षणाला पाठिंबा असताना सर्व राजकीय नेते, पक्ष, संघटना मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना आमदार बबनदादा मात्र यावरून वेगळ्याच वादग्रस्त टिप्पण्या करताना दिसत आहेत त्यामुळे राज्यात नारायण राणे आणि सोलापूर जिल्ह्यात बबनराव शिंदे यांच्या विषयी संतापाची लाट उसळलेली दिसत आहे. त्यांच्या वयाचा नक्कीच आदर आहे पण आपण काय बोलतो, राज्यात आपल्या जिल्ह्याची प्रतिमा काय जाते याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे... राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावे पण संवेदनशील विषयावर बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. नको त्या टिप्पण्या करून विनाकारण जिल्ह्याच्या सौहार्दतेचा माहोल त्यांनी बिघडवू नये... गरीब मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ते प्रस्थापित असल्यामुळे त्यांना याचे महत्त्व कळत नसेल...पण किमान त्यांनी जिल्ह्याचा नारायण राणे होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे... आणि बोललेले शब्द माघारी घ्यावे... व माफी मागावी अन्यथा मराठा बांधव त्यांना कदापिही माफ करणार नाही इतकेच..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा