उपसंपादक .........नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील तांबवे पाटीजवळ असलेल्या पायरीच्या पुला जवळील नव्या बांधलेल्या एकमुखी दत्त महाराजांच्या मंदिराजवळ मठाच्या बांधकामाचे भूमिपूजन विजयादशमीच्या मुहूर्तावर अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व शिवशंकर बाजारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी या पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन लोक वर्गणीतून हे एकमुखी दत्त महाराजांच्या मंदिराजवळ उभारणी केली आहे.बघता बघता या एकमुखी दत्त महाराज यांच्या मंदिराची प्रसिद्धी तालुक्यात झाल्यामुळे दर गुरुवारी भाविक व भक्तांचा ओघ या मंदिराकडे येऊ लागला आहे.जो तो भाविक आपल्या परीने होईल तेवढी मदत करत आहे.
या कार्यक्रमाला मंदिर समितीचे अध्यक्ष अभिमन्यु साळुंखे,सचिव पूनम साळुंखे तसेच संचालक तात्या घोंगाने,संभाजी घोगाणे,बापु तात्या मुंडफणे, महादेव चव्हाण,संभाजी इनामदार,दादा लाटे,दादा जाधव,दादा वाघ,कांतीलाल एकतपुरे,शंकर थोरात,विराज निंबाळकर तसेच महाळुंंग तांबवे गावचे मान्यवर उपस्थित होते.
शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमानिमित्त मोठ्या प्रमाणात अन्नदानाचे पुण्यकार्य मंदिर समिती तर्फे करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दुपारी १२ वाजता दत्त मंदिरात उपस्थित राहावे असे अवाहन दानशूरांच्या वतीने करण्यात आले आहे.जर कुणाला अन्नदान करण्या ची इच्छा असेल तर इच्छुकांनी 9970589333या मोबाईल नंबरवर संपर्क करून पुण्य कार्यात सहभागी व्हावे .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा