इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
-नीरा नरसिंहपुर (ता. इंदापूर) येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या पावन भूमीत अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन सोहळ्यास सुरूवात करण्यात आली. श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या ६५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त रविवार जगद्गुरु संत तुकोबाराय गाथा ग्रंथाचे पूजन गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज व त्यांच्या सुविद्या पत्नी सौ. रजनी बापूसाहेब देहुकर, गुरुवर्य सोहम बापूसाहेब देहुकर, सौ.रविना सोहम देहुकर, सौ स्नेहल सौरभ देहुकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. तसेच निरा नरसिंहपूरच्या नुतन सरपंच सौ अर्चना सरवदे व सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे यांच्याही हस्ते ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी हाजारो टाळकरी, मृदुंग वादक, भाविक, भक्त तसेच आळंदी व देहू संस्थांचे पदाधिकारी या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह भ प अंकुश महाराज रणखांबे, विणेकरी वेदमूर्ती आनंद काकडे तसेच श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर सप्ताह कमिटीच्या वतीने परीसरातील शंभरहून अधिक गावांचा यामध्ये समावेश आहे. सप्ताहाची रविवार (दि २९) रोजी श्री गुरु कानोबा महाराज देहुकर पंढरपूर यांची कीर्तन सेवा झाली. तर सोमवार (दि ३०) रोजी ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासा यांची कीर्तन सेवा होणार आहे. तसेच मंगळवार (दि ३१) रोजी ह भ प महामंडलेश्वर जगद्गुरु द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, बुधवार (दि १) रोजी श्री गुरु डॉ. जयवंत महाराज बोधले धामणगाव,
गुरुवार (दि २) रोजी श्रीगुरु केशव महाराज नामदास पंढरपूरकर, शुक्रवार (दि. ३) रोजी ह भ प श्री गुरु योगीराज महाराज गोसावी पैठण, शनिवार (दि ४) रोजी ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम क्षेत्र आळंदी यांचे होणार आहे.
रविवार (दि ५) रोजी लक्ष्मी नरसिंहच्या पावन भूमीत गाव दिंडी प्रदक्षिणा, टाळ व मृदंगाच्या निनादात घालण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचे काल्याचे किर्तन होईल. यावेळी उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देऊन सप्ताहाची सांगता होईल.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा