श्रीपूर --ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मराठा योध्दे मनोज जरांगे पाटील तुम्ही महाराष्ट्राला हवे आहात आरक्षण मिळावे यासाठी तुमचे आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे आरक्षण मिळावे ही आता मागणी नव्हे गरज झाली आहे तुमची तळमळ आस्था प्रामाणिक आहे पण नालायक सरकार आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करत आहे आपण अन्नत्याग पाणी वर्ज्य करून आपले आरोग्य धोक्यात घालून समाजाचा लढा सुरूच ठेवला आहे आपण केवळ मराठा समाजाचे आता राहिला नाहीत तुम्ही संपुर्ण महाराष्ट्राचे नेते झाला आहात तुमच्या निस्सीम प्रामाणिक नेतृत्वावर महाराष्ट्राचा विश्वास बसला आहे तुम्ही तुमचे उपोषण करा पण पाणी वैद्यकीय उपचार नाकारु नका लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे ही सदिच्छा व मागणी तमाम महाराष्ट्राची आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा