विशेष -प्रतिनिधी --कासिम(राजु)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
महाराष्ट्रात सर्वत्र मराठा समाज हा आरक्षण विषयावर आंदोलन करत आहे. मराठा समाजाचे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान आहे. मराठा समाजातील मुख्य व्यवसाय हा शेती असून ९९% मराठा समाज हा अल्पभूधारक आहे. मराठा समाजात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मराठा समाजास आरक्षण नसल्याने गरीब मराठा कुटुंबातील मुले अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. आज समाजाची परिस्थिती पाहता मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे.
तसेच मी महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य या नात्याने सकल मराठा समाजाच्या आरक्षण
मागणीस व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय
घेऊन मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी विनंती करतो.
असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे
-राम विठ्ठल सातपुते (आमदार माळशिरस विधानसभा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा