उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 नूज मराठी
अकलूज महर्षी चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अकलूज,शंकरनगर,संग्रामनगर येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू आहे.
आज मराठा समाज बांधवांच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणास विरोध करणारे नेते रामदास कदम,छगन भुजबळ,ॲड.गुणरत्न सदावर्ते,सदा खोत,नारायण राणे आणि आरक्षणास जाणून बुजून विलंब करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या प्रतिमांना जोड्यांनी मारून त्यांचेवर शेणाचा अभिषेक करण्यात आला.तसेच प्रतिमांना लाथानी तुडवून रस्त्यावर फेकून दिले.यावेळी मराठा समाज बांधवांच्या घोषणानी महर्षी चौक दुमदुमला होता त्यामध्ये...एक मराठा कोटी मराठा...आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचे...कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही...शेण खावा कुत्र्यांनो महाराष्ट्रातील मंत्र्यानो...अशा घोषणाबाजीने आसमंत दुमदमून गेला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा