Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

अग्नीवीर अमृतपाल सिंगचा पुँछ जिल्ह्यात कर्तव्यावर मृत्यू-- भारतीय लष्कर म्हणते ! स्वतःला इजा करून त्याचा झाला मृत्यू , गार्ड ऑफ ऑनर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाला नाही.

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                         अग्निवीर अमृतपाल सिंग (Agniveer Amritpal Singh) यांनी जम्मू काश्मीरमध्ये पूँछमध्ये कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले. ड्युटीवर असताना गोळी लागल्याने अग्निवीर अमृतपाल सिंग शहीद झाले.          


 त्याचवेळी लष्कराने त्यांना सलामी न दिल्याने उत्तर प्रदेशात संतापाची लाट पसरली आहे. पंजाबचा रहिवासी अमृतपाल सिंग हा त्यांच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, जो डिसेंबर 2022 मध्ये अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाला होता. भारतीय लष्कराने शनिवारी सांगितले की, अमृतपाल सिंगचा 11 ऑक्टोबर रोजी स्वत: ला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला. विद्यमान धोरणानुसार त्याला गार्ड ऑफ ऑनर किंवा लष्करी अंत्यसंस्कार प्रदान केले गेले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अग्निवीर अमृतपाल सिंगच्या निधनाचे वृत्त समजताच पंजाबमध्ये शोककळा पसरली. भारतीय लष्कराकडून शहीद जवानाच्या पार्थिवाला सलामी देण्यात आली नाही. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि राष्ट्रीय लोकदलाने केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अग्निवीर अमृतपाल सिंग यांना शहीद दर्जा न देणे आणि लष्कराच्या वतीने सलामी न देणे हा शहीदांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ट्विट करून म्हटले आहे की, अग्निवीर भरती झाल्यावर देशासाठी बलिदान देण्याचे कर्तव्य सांगून शहीद जवानाला मिळणारा सन्मान हिरावून घेतला, ही विडंबना आहे. शहीद अमृतपाल सिंग यांना लष्करी सन्मानाने अंतिम निरोपही देण्यात आला नाही. त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनाऐवजी एका खासगी रुग्णवाहिकेतून लष्करातील हवालदार आणि दोन जवानांनी आणले. हा देशाच्या हुतात्म्यांचा अपमान नाही तर काय आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा