श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण .
टाइम्स 45 न्युज मराठी
मो;-9527 456 958
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील श्रीपूर अकरा सेक्शन ते चौदा पर्यंतचा रस्ता पुर्ण उखडला आहे रस्त्यावर नावालाही डांबर राहिले नाही जागोजाग खड्डे पडले आहेत हा रस्ता अकलूज ते नेवरे मिरे काही भाग पुढं उंबरे कोंढारपटटा नेवरे नेवरे मार्गे करकंब नेमतवाडी व काही गावांना जोडणारा रस्ता आहे दररोज या खराब व धोकादायक रस्त्यावरुन वहातुक सुरू असते तसेच याच रस्त्याने शालेय विद्यार्थी बहुसंख्येने सायकलवर शाळेला येतात आता पुढील पंधरवड्यात माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होतील ऊस वहातुक मोठ्या प्रमाणावर सुरू असते अशा खड्डे पडलेल्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व नविन मंजुरी बाबत अनेकदा नागरिकांनी तक्रारी निवेदन दिले कोणताही लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे या भागातील काही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते खाजगीत बोलतात की या मध्ये नेत्यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे सदर रस्ता होत नाही या रस्त्याच्या कामाचे श्रेय कोणाला जाऊ नये यासाठी विरोधाला विरोध म्हणून हेतुपुरस्सर रस्त्याचे काम रखडवले जात आहे या राजकिय नेत्यांच्या राजकारणात प्रवासी ,नागरिक व वाहन चालकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. हा नेत्यांचा श्रेयवाद नागरिक व वाहन चालकांचा बळी तर घेणार नाही ना? नेत्यांना आपल्या कडे श्रेय घेण्याची काळजी आहे परंतु ज्या मतदाराच्या जीवावर निवडून आलात त्या मतदाराच्या जीवाची काहीही काळजी नाही? वेळ आल्यानंतर मतदार अगदी बरोबर श्रेय देतील तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल नंतर पश्चातापाशिवाय काहीही उरणार नाही दरवर्षी या खराब रस्त्यावर नेहमी ऊस वहातुक करणार्या ट्रॕक्टर ट्राली पलटी होऊन अपघात होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा