टाइम्स 45 न्युज मराठी
मो.;- 9730 867 448
तुळजापूर शहरात अनाधिकृतपणे लावण्यात आलेले सर्व डिजिटल पोस्टर काढण्यात यावे याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त अशी की
अनाधिकृत पणे लावण्यात आलेले तुळजापुर शहरातील सर्व डिजीटल पोस्टर कादुन तुळजापुर शहरात येणाऱ्या भाविका भक्तांना मोकळा श्वास घेण्यासाठी तुळजापुर शहरातील सर्व अनाधिकृत डिजीटल पोस्टर तात्काळ संबधित विभागाला सुचना देऊन काढण्यात यावेत.
तरी तुळजापूर नगरपरिषदे चे मुख्याधिकारी यांना विनंती आहे कि सर्व राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा उपयोग करून मराठा समजाला आरक्षणा साठी दिलेला शब्द न पाळल्याने सकल मराठा समाजाने आजी, माजी राजकीय सर्व पक्ष पुढाऱ्यांना तुळजापुर गाव बंदी चा निर्णय घेण्यात आला असुन मराठा समाज सर्व राजकीय पक्षावर तिव्र नाराज असल्याने एकाही राजकीय पुढाऱ्याचे डिजीटल पोस्टर ठेवण्यात येऊ नये ठेवल्यास होणाऱ्या विठंबनास व घडणाऱ्या घटनेची सर्वेस्वी जबाबदारी नगरपरिषदेची असेल याची नोंद घ्यावी. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
माहितीस्तव या निवेदनाची प्रत पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे तुळजापुर यांना देण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा