Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

सोलापूर जिल्हा मुद्रांक विक्री संघटनेच्या वतीने 30 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन.

 


संपादक ---हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.;- 9730 867 448

                           -अखिल महाराष्ट्र मुद्रांक समिती मार्फत सोलापूर जिल्हा मुद्रांक विक्री संघटनेच्या वतीने ३० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे धरणे आंदोलन व मुद्रांक विक्री व दस्त नोंदणी लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे कळवले आहे. 



   याबाबत सविस्तर वृत्त असे की, पूर्वीपासून मुद्रांक विक्रेते स्टॅम्प पेपर विक्री करून शासनाला मोठ्या प्रमाणात महसुल जमा करून देत आहेत. परंतु प्रसार माध्यमातून असे समजले की महाराष्ट्र शासनाने १०० व ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ऐवजी फ्रैंकिंग मशीन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत चालवण्याचा विचार आहे. यामुळे मुद्रांक विक्रेत्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. आता जर शासनाने १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करून फ्रॅकिंग मशीनद्वारे व बँकेमार्फत स्टॅम्प विक्री केल्यानंतर मुद्रांक विक्रेत्यांचे कुटुंब उध्वस्त होतील. तसेच सर्व मुद्रांक विक्रेत्यांचा रोजगार हिरावल्याने ते बेरोजगार होतील. त्यामुळे शासनाने मुद्रांक विक्रेत्या बाबत सहानुभूतपूर्वक विचार करून आमचे संसार उध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. सदरचे मुद्रांक बंद न करता पूर्वीप्रमाणे मुद्रांक विक्रेत्यांमार्फत मुद्रांक विक्री चालवावी अशी विनंती शासनाला निवेदनाद्वारे केलेली आहे. 

   त्यासाठी मुद्रांक विक्री संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून एक दिवसीय धरणे आंदोलन करून दिनांक ३० ऑक्टोबर रोजी मुद्रांक विक्री व दस्त नोंदणी लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. अशा आशयाचे निवेदन मुद्रांक विक्री संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मुद्रांक जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. सदरच्या आंदोलनात जास्तीत जास्त मुद्रांक विक्रेत्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा