Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

"एकच मिशन --मराठा आरक्षण" हा लढा अंतिम निर्णय घेऊनच थांबेल. ---- सचिन जगताप.

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                           सर्वांना जय जिजाऊ ..

मराठा आरक्षण हा मराठा समाजाच्या अतिशय निकडीच्या अन् जिव्हाळ्याच्या प्रश्नावर स्मृतीशेष अण्णासाहेब पाटील,युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब,स्मृतीशेष अण्णासाहेब जावळे पाटील,स्मृतीशेष विनायकजी मेटे यांच्यासह असंख्य नेतृत्वाखाली गेल्या पस्तीस वर्षातील प्रदीर्घ संघर्षासह आज पुनश्च "एकच मिशन मराठा आरक्षण" यासाठी आंतरवाली सराटी येथे शिवश्री मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढ्यात दिवसभर सभा व प्रवास सोईचा व्हावा यासाठी राबणारे-मदत करणारे स्वयंसेवक/ मुस्लिम बांधव/बहूजन बांधव/पत्रकार/पोलीस/प्रशासन/हितचिंतक सर्वांनी दिलेले सहभाग व योगदान हे अतुलनीय आहे समाजबांधव म्हणून सर्वांचे मनापासून आभार.... गावखेड्यातून सहभागी झालेले महिलांसह-लहान मुले ते अबालवृध्द यांनी सभेत कोटी केली अन् राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालायचे काम केले.हा लढा अंतिम निर्णय घेऊनच थांबेल हे नक्की.




शिवश्री सचिन जगताप

जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड 

सोलापूर-पंढरपूर विभाग 

9696969558

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा