Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

भारतात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शन-- लोक रस्त्यावर उतरले-- पी .एम. मोदी कडे केली ही मागणी.

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                      इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचे पडसाद इतर देशातही उमटत आहेत. इस्रायलचा दावा आहे की, 80 देश त्यांच्या समर्थनात उभे आहेत तर अनेक देश पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत. विशेष म्हणजे, भारतातील अनेक शहरांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात शुक्रवारी निदर्शने झाली. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये लोकांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आवाज उठवला. बंगळुरूच्या जामिया मशिदीचे इमाम मौलाना मकसूद इम्रान म्हणाले की, इस्रायली सैन्य पॅलेस्टाईनच्या मुस्लिमांवर अत्याचार करत आहे.         

  

 ज्यू हे मुस्लिमांना जबरदस्तीने त्यांच्या भागातून हाकलून लावत आहेत. इस्रायली लष्कराने अल अक्सा मशिदीमध्ये नमाजपठण करण्यावर बंदी घातली आहे. पॅलेस्टाईनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली. 

झारखंडच्या जमशेदपूरमध्येही मुस्लिम समुदाय पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहे. जमशेदपूरच्या आंबा आझाद नगरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करत इस्रायलविरोधात नाराजी व्यक्त केली. ,        

     


 उत्तर प्रदेशातील लखनऊमध्येही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. लखनौच्या आसिफी मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर डाऊन विथ इस्त्रायल आणि डाऊन विथ अमेरिका अशा घोषणा देण्यात आल्या. येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात प्रार्थना करण्यात आल्या. शिया धर्मगुरू मौलाना कल्बे नवाद यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले की, ते एक शक्तिशाली पंतप्रधान आहेत आणि त्यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी पुढे यावे. पॅलेस्टाईनच्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.

बिहारच्या किशनगंजमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर तरुण रस्त्यावर उतरले आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या आंदोलनात काही अल्पवयीन मुलांनीही सहभाग घेतला. किशनगंजच्या मुख्य बाजारपेठेत हे आंदोलन झाले, ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. कोलकात्यातही अल्पसंख्याक युवा मंचाचे सदस्य पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहेत. यावेळी आंदोलक पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी बॅनर घेऊन निदर्शने करण्यात आली. भारताने या मुद्द्यावर नि:पक्षपाती भूमिका घ्यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे.


सौजन्य ;--माहिती सेवा ग्रुप--पेठवडगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा