इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
शारदीय नवरात्रौत्सव उत्सवानिमित्त उद्या घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त घरोघरी घटाची विधीवत स्थापना केली जाते. त्यासाठी लागणारे विड्याची पाने, हळदी, कुंकू, सात धान्य व माती विक्रीची दुकाने थाटली आहेत.
शारदीय नवरात्रौत्सव उत्सवाला उद्या पासून सुरूवात होणार आहे. पितृपक्ष पंधरवड्याची आज सांगता होणार आहे. त्यानंतर गावोगावी देवीच्या स्थापनेसाठी कार्यकर्ते मंडप उभारणी करण्यात मग्न झाले आहेत. तर सायंकाळी साडेतीन पिठापैकी एका ठिकाणी जाऊन दिप प्रज्वलीत करून आणली जाते. त्यानंतर देवीची मंडपात विधीवत प्रतिष्ठापना करून आरती केली जाते.
तर घरोघरी घटाची विधीवत स्थापना करण्याकरीता केळीच्या पानावर माती आणून देव्हाऱ्यावर ठेवण्यात येते. त्यानंतर त्या मातीमध्ये गहु, हरभरा, बाजरी, करडी, मका, सातू, ज्वारी हे सात धान्य मिक्स करण्यात येतात. त्यावर तांब्या ठेवून त्यामध्ये विड्याची पाने, नारळ ठेवण्यात येतात. दररोज त्याची सकाळ संध्याकाळ आरती करण्यात येते.
घटाला लागणारे साहित्य हळदी, कुंकू, गहु, हरभरा, बाजरी, करडी, मका, सातू, ज्वारी हे सात धान्य, विड्याची पाने विक्रीची दुकाने आठवडे बाजारात थाटण्यात आली होती. विड्याच्या पानांनी शंभरी पार केली तर सात धान्याचे पाकीट दहा रुपयांना व हळदी, कुंकू दहा रूपये पन्नास ग्राम असा दराने विकले जात आहे.
फोटो - नरसिंहपूर येथील आठवडे बाजारात घटाच्या साहित्य विक्रीची दुकाने थाटली होती.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा