Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

वापरात नसलेली" ट्रॅव्हल्स" वापरात दाखवून" टॅक्स" वाढवण्यासाठी लाच मागितले प्रकरणी लातूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात.

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                        "वापरात नसलेल्या " ट्रॅव्हल्स चा "वापर " दाखवून- टॅक्स- वाढव ण्यासाठी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आरोपी लोकसेवक १. विजय चिंतामण भोये वय ४६ वर्षे पद लातूर जिल्हा - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्ग-१, लातूर २. प्रमोद उत्तम सोनसाळी वय ४४ वर्षे, धंदा नोकरी, पद कनिष्ठ लिपिक, प्रादेशिक परिवहन - विभाग, लातूर, ३. जिलानी मेहबूब शेख, वय ४९ वर्षे, पद खाजगी इसम (एजंट), रा. इंडिया नगर अमन कॉलनी, लातूर यांच्या विरुध्द कलम ७, ७ अ. १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल. झाला आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की

यातील तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्स चा व्यवसाय असून त्यांनी 'ना वापर' प्रकारात असलेली एक ट्रॅव्हल्स गाडी 'वापर' प्रकारात आणून त्यावरचा टॅक्स वाढविण्यासाठी आरोपी लोकसेवक क्र. १ विजय भोये यांनी सुरुवातीस ५००० /- रुपयेची व तडजोडी अंती ३०००/- रुपयेची पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम आरोपी लोकसेवक क्र .२ प्रमोद उत्तम सोनसाळी, लिपीक प्रादेशिक परिवहन विभाग, वर्ग ३, लातूर यांच्या कडुन स्विकारण्याचे कबुल केले. सदरची लाचेची रक्कम ३००० /- रुपये आरोपी लोकसेवक क्र.२ प्रमोद उत्तम सोनसाळी, लिपीक प्रादेशिक परिवहन विभाग, लातूर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर येथे पंचासमक्ष स्वतः स्विकारली. लाच रक्कम रक्कम स्विकारण्यासाठी आरोपी लोकसेवक क्र . ३ जिलानी मेहबूब शेख, खाजगी इसम यांनी प्रोत्साहन दिले आहे. सर्व आरोपींना रंगेहात पकडण्यात आले..



वरील प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे घटक यांचे कडुन झालेल्या सापळा कारवाई वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर घटकाच्या दोन पथकांनी लागलीच वरील दोन आरोपी लोकसेवकांच्या घरी छापे टाकुन परझडती केली असता घराडती दरम्यान काही एक संशयीत रक्कम अथवा दस्ताऐवज आढळुन आलेली नाही. वरील प्रमाणे झालेल्या सापळा कारवाई वरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे गुरन 615 / २०२३ कलम ७ ७ अ १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये 04/55 वाजता गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, लाच प्रतिबंधक विभाग लातूर हे करीत आहेत. यातील तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.



तरी सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की, शासकीय अधिकारी/ कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात खालील क्रमांकावर संपर्क करावा.

डाॕ.राजकुमार शिंदे -पोलिस अधिक्षक ;-मो.९६२३ ९९९ ९४४

पंडित रेजितवाड-पोलिस उप-अधिक्षक ;--मो.९३०९ ३४८ १८४

टोल फ्री क्रमांक ;--१०६४


कार्यालयाचा फोन क्रमांक ;--०२४८२ २४२ ६७४.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा