संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
बारुळ ,ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करून त्यांना रक्तगट कोणता आहे याची माहिती करून देण्यात आली. त्याचप्रमाणे रक्तगटाचे प्रकार ,रक्ताचे आयुष्यातील महत्त्व काय आहे ,मानवी जीवनात रक्ताची कशी आवश्यकता भासते याची सविस्तर माहिती सर्व विद्यार्थ्यांना, मुलाणी सर व सारणे सर यांनी विद्यार्थ्यांना दिली. या रक्तगट तपासणी साठी डाॕ. मोहन वट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले
याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर धनवडे ,उपाध्यक्ष रतन मुदगुडे, पोलीस पाटील सगर साहेब,शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर, जेष्ठ शिक्षक सारणे सर, पवार सर ,मुलाणी सर, मोरे मॅडम राजगुरू मॅडम त्याचप्रमाणे घाटे लॅब तुळजापूरचे बिभिषन घाटे, शिवाजी राठोड यांनी लॅब असिस्टंट म्हणून काम पाहिले. या प्रसंगी गावातील नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा