इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी लासुर्णे येथील ॲड. तेजसिंह पाटील व कार्याध्यक्षपदी इंदापूरचे महारुद्र पाटील यांना जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी नियुक्ती पत्राद्वारे निवड केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट झाले होते. अजित पवार गटाने तालुक्यातील पूर्वीच्या तालुकाध्यक्षांचीच फेरनियुक्ती केली. शरद पवार गटाचा तालुकाध्यक्ष कोण होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. दरम्यानच्या काळात खासदार सुप्रिया सुळे यांनी दौरे केले होते. त्यानंतर बुधवारी (ता. १८) मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ॲड. तेजसिंह पाटील व महारुद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी नियुक्तीचे पत्र दिले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ आदी उपस्थित होते.
ॲड. तेजसिंह पाटील हे पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहेत. तर, महारुद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा