Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ मार्च, २०२६

*मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे हेच का महिला विषयी धोरण,... टेंभुर्णी ग्रामपंचायत कडून वृद्ध दाम्पत यांची होते आढावाणूक जागतिक महिला दिनानिमित्त करणार टेंभूर्णी ग्रामपंचायतपुढे एका वृद्ध महिलेचे उपोषण*.

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*



सरपंच ग्रामपंचायत टेंभूर्णी यांचेकडून वृद्ध दाम्पत्यांची अडवणूक.

8 मार्च 2026 जागतिक महिला दिनापासून महिलेचे न्याया साठी प्राणांतिक उपोषण.


टेंभूर्णी ग्रामपंचायत क्षेत्रातील वयोवृद्ध नागरिक श्री शशिकांत गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ.सरला श. गायकवाड यांच्या घराची पडझड झाल्यामुळे व त्यांना तीन विवाहित मुली असल्याने आधार देणारे कोणीही नाही.वडिलोपार्जीत घर हे पडण्याच्या स्थितीत असल्याने पावसाळ्यापूर्वी ते पाडून नवीन बांधकाम करण्याचा त्यांचा इरादा होता.त्यासाठी त्यांनी रितसर ग्रामपंचायतकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला होता.व स्वमालकिच्या सामाईक जागेमध्ये मालकी हक्क असणाऱ्या गायकवाड कुटुंबातील व्यक्तींशीं चर्चा करून जीना उभारला होता.त्यांनी आमची हरकत नाही म्हणून पंचा समक्ष कबूल करून जीना बांधला तोच जीना अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी पाडून टाकला.त्याची रीतसर तक्रार एसी टेंभूर्णी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती परंतु तेथे पण पोलीस प्रशासनांकडून कोणतीही दखल अथवा तपास केला गेला नाही.        

               सदर सामाईक जागेमध्ये ग्रामपंचायतीचा त्यावर कोणताही मालकी हक्क नसताना बेकायदेशीर स्वरूपात नोटीस देऊन हेतू पुरस्करपणे बांधकाम बंद ठेवण्याचा त्यांनी लेखी आदेश दिला.तो पूर्णपणे बेकायदेशीर असून सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम केलेले नाही.मात्र सरपंच यांना त्यांच्या हितचिंतकांकडून मिळालेल्या खोट्या माहितीच्या आधारे ही कारवाई सूडबुद्धीने झाली आहे.त्यासाठी टेंभूर्णी ग्रामपंचायतकडे अनेक पत्रव्यवहार केले गेले, माहिती अधिकार टाकले परंतु निर्ढावलेल्या यंत्रणेने याची दखल घेतली नाही.असा नाकर्तेपणा करणा-यावर दप्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे.पत्र व्यवहार आणि उत्तर व कोणतीही कार्यवाही केली नाही.उन्हाळ्याचे दिवस आहेत व पावसाळा सुरू होईल म्हणून हे वृद्ध दाम्पत्य सध्या भाडोत्री घरात राहत आहेत. मोलमजुरी शिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. अशा अवस्थेत ग्रामपंचायतीने ही चालवलेली त्यांची अडवणूक बुचकळ्यात टाकणारी आहे.       


                              अशा दांडगाईला व नाकर्तेपणाला कंटाळून सौ.सरला शशिकांत गायकवाड यांनी ग्रामपंचायतीकडून न्याय मिळविण्यासाठी रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनापासून ग्रामपंचायती समोर प्राणांतिक उपोषण ठेवले आहे.सर्व शासकीय कायदेशीर बाबी पूर्ण करून व सर्व शासकीय कार्यालयांना लेखी स्वरूपात सूचित केले आहे.टेभूर्णी ग्रामपंचायतचा विनापरवाना अतिक्रमणचा प्रश्न गाजत असल्याने गव्हा बरोबर किडे रगडण्याचा हा प्रकार आहे.त्यांना न्याय मिळेपर्यंत हे प्राणांतिक उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा