विशेष---- प्रतिनिधी
कासिम (राजु)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.84088 17333
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकर नगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल विभागामार्फत दि. ०६/१०/२०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेमध्ये पी यु सी कॅम्प पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. सदर कॅम्प मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या दुचाकी व चार चाकी वाहने पी यु सी करून वायु प्रदूषण रोखण्याचा छोटासा प्रयत्न केला.
सदर कॅम्प सुरळीत पाडण्यासाठी मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल निकम, प्रा. नाना काळे व प्रा. रविकांत देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा