इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- देहू संस्थांनचे माजी अध्यक्ष श्री गुरु बापूसाहेब देहूकर महाराज यांचा ६५ व्या अभिष्ठनचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने रविवारी (दि. २९ आक्टोंबर ते रविवार दि. ५ नोव्हेंबर) दरम्यान भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन सोहळा आयोजित केला आहे. देहूकर फडाचे शंभरहून अधिक गावातील वारकरी व सप्ताह कमिटीच्या माध्यमातून नरसिंहपूर येथील एसटी स्टँड समोर होणार आहे.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज देहू संस्थानचे माजी अध्यक्ष व देहुकर फडाचे मालक श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज यांच्या ६५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज, एमआयटी कॉलेज अध्यक्ष विश्वनाथ कराड उपस्थित राहणार आहेत.
रविवारी (दि.५ नोव्हेंबर) रोजी श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचा ६५ व्या अभिष्टचिंतन निमित्त सन्मान व काल्याचे कीर्तन होणार आहे. यासाठी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार यशवंत माने, आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार संजय मामा शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, अभिजीत पाटील, माजी सभापती प्रवीण माने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
आळंदी येथील शांती ब्रह्म कुरेकर बाबा, पंढरपूर येथील सर्व फडकरी महाराज मंडळी, सर्व संतांचे वंशज, देहू संस्थान, आळंदी संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समिती, संत सोपान काका संस्थान सासवड, लक्ष्मी नरसिंह देवस्थान सर्व विश्वस्त तसेच सर्वच भागातील भाविक, ग्रामस्थ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त उपस्थित लोकांना अन्नदान, एक हजार टाळकरी व विणेकरी, मृदुंग वादक, सह हजारो भाविक या लक्ष्मी नरसिंहपूर पावन भूमीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थितीत राहणार आहेत. बाहेरील भाविकांना मुक्कामी राहण्याची सोयही करण्यात आली आहे. शेवटी श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अभिष्टचिंतन सोहळ्याची सांगता व महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
फोटो - श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा