टाइम्स 45 न्युज मराठी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सात आपण आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ सर्वत्र विविध कार्यक्रमाने साजरे करत आहोत याचाच एक भाग पौष्टीक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान त्यांचे अहारातील महत्व , वैदयकिय , प्रक्रिया उदयोग , चा प्रचार प्रसार प्रसिद्धी केली जात आहे. मिलेट ऑफ द मंथ ऑक्टो भगर वरई बाबत जाणून घेऊ या ! उपवासाठी शाबूदाणा ला पर्याय असलेले धार्मिक महत्व असलेले तृणधान्य आहे. १- वरई भगर मध्ये इतर तृणधान्य ची तुलणा करता ३०% जास्त एंटीऑक्सीडंट आहे यामुळे वार्धक्य विरोधी कॅन्सर प्रतिबंध करणे केसाचे व त्वचा आरोग्यास लाभधारक आहे. २ - व्हिटॅमीन बी -३ पॅलेग्रा रोगावर म्हणजेच- सुजलेली त्वचा , अतिसार , स्मृतीभ्रंश , तोड येणे या विकारावर लाभादायक गुणकारी आहे. ३ - सोडीयम च्या अल्प प्रमाणात असलेमुळे रक्ताभिसरण नियमित व रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यास मदत करते . ४- कॅल्शिअम जास्त प्रमाणात असलेमुळे शरीराचे तपमान नियमित ठेवण्यास आबाल वृद्ध हाडे बळकटीकरणास मदत होते . ५- वरई / भगर मध्ये मॅग्नेशिअम च्या उपलब्ध प्रमाणामुळे रक्तातील साखर नियंत्रीत ठेवणेस मदत होते . ६- भगर ग्युटेन फ्री असल्याने ग्युटेन अॅलर्जी रुग्णांना लाभदायक अन्न आहे. ७ - लो ग्लायसेमिक इंडेक्स मुळे मधूमेह विकृतीच्या लोकांना पोष्टीक अन्न आहे. ८- सुक्ष्म तंतूमय पदार्थ भरपूर असल्यामुळे पचनास हलके , वजन कमी करण्यासाठी लाभदायक यामुळे शरीर हालके व एनर्जीटीक राहण्यास मदत करते . ९- भरपूर प्रमाणात लोह मुळे रक्तवृद्धी , रकत शुद्धीकरण मदत करते . थॉयरॉईड विकाराच रग्न सोडून इतर सर्व आबाल वृद्ध यांना लाभदायक पौष्टीक तृणधान्य आहे. लागवड तंत्रज्ञान - हालक्या मध्यम ते भारी जमिनीवर येणारे ४५ ते १३० दिवसात तयार होणारे व २५ ते २७ सेन्टीग्रेड तपमानात किफायतशीर उत्पन्न देणारे पौष्टीक तृणधान्ये आहे. वरई लागवड पेरणी २५ सेमी वर हेक्टरी १0 किलो बियाणे वापरून ,पुनर्लागवड हेक्टरी ५ किलो बियाणे ची रोपवाटिका करून रोपे १० सेमी झालेवर लागवड २५x१० से.मीवर केली जाते . बियाणे विसकटून फोकून करावयाची असेल तर १५ किलो बियाणे पुरेशे होते . वरई लागवडसाठी फुले एकादशी, के - १ हलकी जमिन व जीपीयुपी -२१ मध्यम जमिनीसाठी वाण उपयुक्त आहेत . आपेक्षीत उत्पनासाठी पेरणी जुलै ते सब्टेबर मध्ये करावी पेरणी पूर्व बियाणेस २ते ३ ग्रॅम थायरम २५ ग्रॅम अझोस्पीरील म किंवा अॅस्परजिलस ची प्रक्रिया केलेस १५ उत्पन्नात वाढ होते . पेरणी वेळी , पूर्न लागवड वेळी २० किलो नत्र ४० किलो पालाश दिल्यास १०% उत्पादनात वाढ होते . या पद्धतीने लागवड केल्यास १०ते १६ क्वि धान्य व ४० क्वि पौष्टीक चारा उत्पादन देणारे पौष्टीक तृणधान्य आहे. तरी याचे उपवासाला फक्त न वापरता आहारातील प्रमाण वाढवून या पौष्टीक तृणधान्य लागवडीस चालना देऊन तृणधान्ये खा व स्वस्थ रहा !!
सतीश कचरे-- मंडळ कृषी अधिकारी ,नातेपूते.
(ISO 9001--2015)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा