गणेशगाव ---प्रतिनिधी
टाइम्स 45 न्युज मराठी
नुरजहाँ - शेख
डी वाय एस पी (अहमदनगर ग्रामीण ) संपतराव ज्ञानोबा भोसले व निता संपतराव भोसले यांचे कन्या रत्न ऋतुजा हिने चिन मध्ये झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेतील टेनिसमधील मिश्र दुहेरी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे .माळशिरस तालुक्या च्या पूर्व भागात केवळ ६,००० लोकसंख्या असणाऱ्या छोट्याशा गावातील ही सुवर्णकन्या ऋतुजा हिला लहानपणापासून टेनिस खेळाविषयीं आवड होती वडील पोलीस सेवेत कार्यरत आहेत ते ही कॉलेज विश्वात भाला फेक चे नॅशनल खेळाडू होते .पिताकडून मिळालेला खेळाचा वारसा तीने जपला आणी आपल्या माता पित्याचे स्वप्न पूर्ण केले ग्रामस्थांच्या आनंदाला तर सीमा राहिली नाही आमच्या लावंग ची सुवर्णकन्या जगात भारी म्हणून गर्वाने छाती फुगवून गावकरी तिचे कौतुक करीत आहेत .
ऋतुजा मुळे गावची शान वाढली आहे याचा अभिमान ग्रामस्थांना, माळशिरस तालुक्याला सोलापुर जिल्ह्याला,महाराष्ट्राला आणि सम्पूर्ण भारत देशालाच तिचा सार्थ अभिमान वाटत आहे .जगभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .पंचक्रोशीत जागोजागी तिचे बॅनर्स लावून कौतुकाचा अभिमानाचा, आनंदाचा वर्षाव ग्रामस्थ करताना दिसत आहेत . पुणे एअरपोर्टवर येताच सनई चौघडे ढोल ताशा च्या गजरात ऋतुजाचे स्वागत ग्रामस्थानी केले देशाची शान तिरंगा ध्वज तिच्या खांद्यावर लपेटताच आपल्या दोन्ही हातानी ध्वज सांभाळीत ती वडिलांच्या दिशेने आली आणी आपल्या गळ्यातील सुवर्णपदक जन्मदात्याच्या गळ्यात घालताच पितापुत्री ची गळाभेट झाली कर्तव्यदक्ष डी वाय एस पी असणाऱ्या पित्याच्या डोळ्यातून आनंदाश्रूचा झरा वाहु लागताच ग्रामस्थ व उपस्थितांच्या डोळ्यातून ही वाहु लागला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा