अकलूज ---प्रतिनिधी
शकुर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
विद्यार्थिनींना इको फ्रेंडली आकाश कंदील स्वतःच्या हाताने तयार करता यावे तसेच पणती सजावट करता यावी या हेतूने शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशालेमध्ये आकाश कंदील तयार करणे व पणती रंगवणे याबाबतच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या रंगीत पेपरचा वापर करून तसेच लेस वेगवेगळे रंगीत मनी या व अशा अनेक गोष्टींचा वापर करून खूप छान छान असे आकाश कंदील तयार केले.वेगवेगळ्या रंगांचा वापर करून पणत्या सजावटीचे काम केले व यापुढे अशाच प्रकारचे आकाश कंदील स्वतः तयार करून घरी दिवाळीसाठी वापरणार असल्याबाबतचा विश्वास विद्यार्थिनींनी बोलून दाखवला.
सहभागी सर्व विद्यार्थिनींचे संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा श्री जयसिंह मोहिते -पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते - पाटील ,संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती कु. स्वरूपाराणी मोहिते- पाटील , सचिव अभिजीत रणवरे साहेब ,सहसचिव खराडे साहेब यांनी कौतुक केले.
कार्यशाळेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सविता गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशालेचे चित्रकला शिक्षक विशाल लिके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा