Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

*तुळजापूर तालुक्यातील 1132 मतदारांची पुनश्च सर्वे करून मतदार यादीत समाविष्ट करून त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा--- अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन*

 


*संपादक---- हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.--9730 867 448*

                        *तुळजापूर तालुक्यातील मतदार यादितील स्थलांतरीत गैरहजर ११३२२ मतदारांना नोटीस पाठवून मतदार यादीतील ४० टक्के मतदारांना नोटीस मिळाले नसून चुकीचा सव्हें करण्यात आले आहे* *शासकिय, निमशासकिय खाजगी कर्मचारी, अधिकारी हे बाहेरगावी नोकरीस असल्याने त्यांनाही नोटीस तामिल करण्यात आले आहे तहसील* *कार्यालयामार्फत 1132 मतदारांची पुनश्च एकदा सर्वे करून त्यांना त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करावी व त्यांना मतदानाचा हक्कापासून वंचित ठेवू नये अन्यथा महा विकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले आहे तहसीलदार अरविंद बोळोंगे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले*. 



*तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की* *तुळजापूर तालुक्यातील मतदार यादीतील स्थलांतरीत गैरहजर अशा ११३२२ मतदारांना आपल्या कार्यालया मार्फत सर्व्हे करुन नोटीस पाठवीली असुन हा सर्व्हे चुकीच्या पध्दतीने एका जागी बसुन निव्वळ* *कागदपत्रावरती झाला आहे. तसेच ४० टक्के मतदारांना नोटीस मिळाली नसुन सदर नोटीस तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात पडुन आहेत*.


*तसेच शासकीय, निमशासकिय, खाजगी कर्मचारी*, *कामगार, अधिकारी हे बाहेरगावी नोकरीस असल्याने त्यांनाही नोटीस मिळाली नसल्यने त्यांना त्यांचे म्हणने मांडण्यास प्रत्यक्ष नोटीस तामील करण्यात येवुन सुनावणी घेवुन न्याय देण्यात यावा*.


*तरी वरील विषयानुसार आपल्या कार्यालया मार्फत ११३२२


मतदारांची पुनःश्च एकदा सव्हें करुन त्यांना त्यांची नावे मतदार यादिमध्ये समाविष्ट करावे व त्यांना मतदानाच्या हक्कापासुन वंचीत ठेवु नये*. *तसे न झाल्यास नाईलाजास्तव तुळजापूर तालुका महाविकास आघाडी तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे*

*निवेदनावर काँग्रेसचे एडवोकेट धीरज पाटील .शिवसेनेचे श्याम पवार.सुनिल जाधव .शेकापचे राहुल खपले .दिलीप सोमवंशी .उदय भोसले* .*राष्ट्रवादीचे संदीप गंगणे . वैजनाथ बिराजदार. ऋषिकेश मगर .आकाश शिंदे .शंकर शिंदे .आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा