Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

*माणकी येथे शंकरराव रणवरे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा*

 


*अकलूज----प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

                           *प्रतिकुल काळात परिस्थितीवर मात करत शिक्षण घेऊन जीवनाच्या प्रवासात शिक्षकी पेशा स्विकारून आज तालुकात अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्याचे अनमोल कार्य शंकरराव रणनवरे सर यांनी कलेले आहे.असे उद् गार जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.जी माणसे आयुष्याच्या प्रवाहात सतत रहातात अशीच माणसे जीवनाच्या प्रवासात सतत आनंदी व समाधानी असतात असे आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले*.


         *अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखेतून उपमुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेले शंकरराव अनंतराव रणनवरे सर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस माणकी (ता.माळशिरस) येथील 'राजगड' या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*.

            *या कार्यक्रमासाठी सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील,विधान परिषद सदस्य आ.रणजितसिंह मोहिते पाटील,अकलुज येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.एम. के.इनामदार,पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे माजी सभापती दत्ताजीराव चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य लक्ष्मण पवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या*.

         *या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शिरीष रणनवरे यांनी केले. सुत्रसंचालन पोपटराव पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश रणनवरे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक वर्ग,तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर्स,माणकी पंच‌‌क्रोशीतील मान्यवर व रणनवरे परिवारांचे नातेवाईक व मित्र परिवार यांची उपस्थिती लक्षणीय होती*.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा