Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

माळखांबी येथे दीपावली व ग्रामदैवत सप्ताह निमित्त जंगी कुस्त्या संपन्न

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                     दिनांक २२/११/२०२३रोजी माळखांबी येथे दिपावली व ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर सप्ताहाचे औचित्य साधून वर्षाणू वर्षाची कुस्ती मैदानाची परंपरा जोपनारे जय हनुमान तालिम माळखांबी चे वस्तात भगवंत गमे पाटील हे अतिशय कष्टाने मोठ्या प्रमाणात कुस्ती मैदान भरवत असतात न भूतो न भविष्य तो जंगी कुस्त्यांचे मैदान भरवल्यामुळे वस्ताद भगवंत गमे पाटील यांचे कौतुक होत आहे त्या कुस्ती मैदानाची सांगता महाराष्ट्रात होत असते कुस्ती मैदानाची तयारी करत असताना कोणाच्या जिवावर न राहता नियोजन करण्यासाठी स्वतः भर उन्हात उभा राहुन नियोजन केले जाते वस्ताद भगवंत गमे पाटील यांनी भरवलेल्या मैदानाला गावातील नागरिक कार्यकर्ते भरभरून प्रतिसाद देत असतात हिचं परंपरा पुढे चालवण्यासाठी व पुढील कुस्ती मैदान मोठ्या प्रमाणात गाजवुन गावाच नाव उज्ज्वल करण्यासाठी गावचे उपसरपंच भाजप नेते प्रभाकर तात्या गमे पाटील यांनी मैदानावर आलेल्या पैलवान आजी माजी वस्ताद गावातील नागरिक यांना अजुन मोठं मैदान भरवण्याची ग्वाही व आश्वासन दिलं इथुन पुढच्या काळात गावात मोठं मैदान भरवण्याची परंपरा जोपासली तर नक्कीच महाराष्ट्रात मौजे माळखांबी सांप्रदायिक गावाच नाव उज्ज्वल होईल अशी ग्रामस्थांन मधुन चर्चा केली जात आहे कुस्ती मैदान भरविण्यासाठी गावातील काही मंडळी वस्ताद भगवंत गमे पाटील यांची तळमळ व कष्ट बघुन देणगी स्वरुपात मदत ही करतात आज पार पडलेल्या कुस्ती मैदानाला गावातील नागरिक कार्यकर्ते आजी माजी वस्ताद मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते कुस्ती मैदानाची शेवट निकाली कुस्ती पै .साहिल कदम शिवनेरी तालीम अकलूज व पै.ओम माने खुडुस कुस्ती क्रेंद्र अशी इनाम २१००० रुपैयांची लागली होती यात शिवनेरी तालमिचे पै.साहिल कदम यांनी विजयाची बाजी मारली शेवटच्या निकली कुस्ती साठी सोलापूर केसरी पै.किरण कदम व वस्ताद भगवंत गमे पाटील उपसरपंच प्रभाकर तात्या गमे पाटील ह्यानी पंच म्हणून काम पाहिले




 सदर मैदानाचे सुत्रसंचलन युवराज केचेसर यांनी केले त्यावेळी कुस्ती मैदानाला गावचे उपसरपंच भाजप नेते आदरणीय प्रभाकर तात्या गमे पाटील ,भागवत बप्पा गमे पाटील,बलभीम चव्हाण साहेब,भगवानराव गमे पाटील, वस्ताद गोपीनाथ पाटोळे उपस्थित होते यांच्या हस्ते गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी झगडनारा वस्ताद भगवंत गमे पाटील यांना मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला सदर कुस्ती मैदान पार पाडण्यासाठी दिपक गमे पाटील, आमोल (भैय्या) गमे पाटील,दत्ता गमे पाटील, राजेंद्र गमे पाटील,लव्हुराज गमे पाटील, सोमनाथ गमे पाटील,विजय गमे पाटील,पिनू जगताप यांनी अथक परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा