संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सन 2023-24 गळीत हंगामासाठी गाळपास आलेल्या ऊसासाठी रक्कम रू 2600 प्रति मे टन प्रमाणे तसेच बिगर ऍडव्हान्स तोडणी वाहतुकीची तिसऱ्या मस्टर ची बिले दिनांक 29/11/2023 रोजी सभासद,ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असलेची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तिसऱ्या मस्टर ची ऊस बिले,तोडणी वाहतुकीची बिले 12 व्या दिवशी अदा करणेची वचनपूर्ती कारखान्याच्या व्यवस्थानाकडून केली जात असलेचे यावेळी बोलताना श्री कुलकर्णी यांनी सांगितले. दर दहा दिवसाला बिले अदा करणारा श्री शंकर साखर कारखाना सोलापूर जिल्हयातील दुसरा कारखाना असलेचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या 25 दिवसात अंदाजे 25 कोटी रक्कमेची ऊस व तोडणी वाहतूक बिले अदा झालेली आहेत. बॉयलर तसेच कारखाना मशिनरी चे आधुनिकीकरण केलेने कारखान्याचे गाळप विना अडथळा चालू असून सभासद तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने व विश्वासाने कारखाना गाळप हंगाम प्रगतीपथावर आहे. कारखाना व्यवस्थापनाने 4 लाख मे टन गाळपाचे उद्धिष्ट निर्धारित केले असून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठविणेचे आवाहन श्री कुलकर्णी यांनी यावेळी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा