निमगाव----प्रतिनिधी
रामभाऊ मगर
टाइम्स 45 न्युज मराठी.
निमगाम म येथील महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे अभ्यासक डॉ. राजेंद्र मगर यांना पुणे येथील सुश्री फाऊंडेशनचा ‘श्रीमती सरोजबेन परिख मेमोरियल अवॉर्ड २०२४’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मगर यांनी बडोद्याचे सयाजीराव महाराज यांच्यावर केलेल्या ऐतिहासिक संशोधनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड समितीवर 'संशोधन सहायक' म्हणून काम करताना मगर यांचे 12 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांनी शासनाच्या वतीने प्रकाशित झालेल्या 62 ग्रंथांत इतर लेखक-संशोधकांना मदत केली आहे. त्याबरोबर विविध वृत्तपत्रांत महाराजांच्या सुधारणांवर लेखन करत वेगवेगळ्या चर्चासत्रांतूनही त्यांच्या सुधारणांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली आहे.
सुश्री फाऊंडेशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मगर यांच्या संशोधनाविषयी गौरव उद्गार काढले आहेत. पुरस्कार 'श्री. अंबेप्रसाद परिख आणि सरोजबेन परिख' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जातो. ११,००० रु. चा धनादेश, ज्ञानाचे प्रतिक सरस्वती देवीचा फोटो आणि काही पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण पुढील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे सावरकर वाचनालयात होणार आहे.
पुरस्काराचे हे नववे वर्ष असून
मगर यांना या संशोधनासाठी यापूर्वी तरवडी, अहमदनगर येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील आणि पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव लेखक बाबा भांड ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा