Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

श्रीक्षेत्र तुळजापूर येथील नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची चौकशी करून कारवाई करावी---- धाराशिव जिल्हा शिवसेना उपप्रमुख" शाम पवार" यांची मागणी

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                       श्री क्षेत्र तुळजापूर येथील जुने बसस्थानक पाडुन त्या जागी जे नविन बसस्थानक उभा करण्यात येत असुन सदर काम हे वाळु न वापरता दगडापासुन बनविलेले डस्ट मध्ये बांधकाम चालु असल्या बाबत तसेच नविन बस स्थानकाचा नियोजीत नकाशा, आराखडा न लावता व इस्टीमेंट प्रमाणे काम होत नसले मुळे चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी धाराशिव जिल्हा शिवसेना उपप्रमुख शाम पवार यांनी निवेदना द्वारे विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग धाराशिव यांचे कडे केले आहे



याबाबत सविस्तर वृत्त असे की

 श्री क्षेत्र तुळजापूर येथील जुने बसस्थानक पाडुन त्या जागी जे नविन बसस्थानक उभा करण्यात येत आहे. त्याचे बांधकाम काम हे रेती (वाळु) न वापरता दगडापासुन बनविलेले "डस्ट" मध्ये बांधकाम केले जात आहे. तसेच जे जुने स्टँड मध्ये स्क्रॕप मटेरीयल (स्टील) याचा वापर सदर बांधकामात केलेल जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सदर बांधकाम हे पत्र्याचे कंपाऊंड मारुन त्याच्या आत अतिशय निकृष्ट दर्जाचे व बोगस काम केले जात आहे. तसेच नविन बस स्थानकाचा नियोजीत नकाशा, आराखडा सदर ठिकाणी न लावता व इस्टीमेंट प्रमाणे मटेरीयल वापरुन काम होत नाही.तरी

सदर बस स्थानकाचा आराखडा हा पुढील 50 वर्षाचा विचार करुन करण्यात आलेला आहे परंतु होत असलेले बांधकाम पाहाता सदर काम हे केवळ 5 ते 10 वर्षापर्यतच टिकणार आहे. तसेच खडी पासुन बनविलेल्या "डस्ट "मध्ये काम चालु असुन बांधकामावर पाणी वापरल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे नित्कृष्ट बांधकामामुळे भविष्यात कोणत्याही वेळी सदर बांधकाम ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बांधकाम ढासळल्यास मोठी जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही



तरी आपण याबाबत तात्काळ चौकशी करुन चालु असलेले बांधकाम तात्काळ थांबवून इस्टीमेंट प्रमाणे व नियोजीत आराखड्या प्रमाणे सदर चालु करण्यात यावे अन्यथा नाइलाजा स्तव लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल आणि होणाऱ्या परिणामास आपण स्वतः व्यक्तीशा जबाबदार राहाल असेही निवेदनात म्हटले आहे.



माहीतीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्त हा निवेदन

. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई.


मा. विरोधीपक्ष नेते, विधानपरिषद, विधान सभा महाराष्ट्र राज्य       


 जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव.


 ओमराजे निंबाळकर, खासदार धाराशिव.

. कैलास (दादा) पाटील, आमदार धाराशिव

आदिंना देण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा