Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या प्रति मेट्रिक टन रक्कम 2600/_ रु. प्रमाणे प्रथम ॲडव्हान्स जाहीर

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                           शंकरनगर-अकलूज येथील 

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सिझन २०२३-२४ नुकताच सुरू झालेला आहे.

        या सिझनमध्ये गाळपास येणा-या ऊसाकरीता प्रथम ॲडव्हान्स रक्कम रु.२६००/- प्रमाणे आदा करणेत येणार असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली.

            कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगती पथावर वाटचाल करीत असून चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये १० लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे.सध्या प्रति दिवस ८५०० मे.टनापेक्षा जास्त ऊस गाळप होत आहे.आज अखेर १ लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे.सर्व ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी केले.

        यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख,संचालिका,

स्वरुपाराणी मोहिते-पाटील, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे,सतीश शेंडगे,नानासाहेब मुंडफणे,विजयकुमार पवार,रावसाहेब मगर,संग्रामसिंह जहागिरदार,रामचंद्र सिद,विराज निंबाळकर,रावसाहेब पराडे,महादेव क्षिरसागर,भिमराव काळे,अमरदिप काळकुटे,गोविंद पवार,सुभाष कटके,जयदिप एकतपुरे,रामचंद्र ठवरे,तज्ञ संचालक,प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत पाटील, संचालिका सुजाता शिंदे,कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे,बाळासाहेब माने-देशमुख,कालीदास मिसाळ,दत्तात्रय चव्हाण,विनायक केचे,राजेंद्र भोसले,अमृतराज माने-देशमुख,धनंजय सावंत,नामदेव चव्हाण,धनंजय दुपडे,अनिलराव कोकाटे,श्रीकांत बोडके,सौ.हर्षाली निंबाळकर,श्रीमती पुष्पा महाडीक तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा