Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

गणेशवाडी येथे दिंडीतील वारकऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने परंपरेप्रमाणे आमटी- भाकरीचा प्रसाद वाटप

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                        : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून निघालेल्या देहूकर दिंडीचा मंगळवार (ता. २८) गणेशवाडी (ता. इंदापूर) येथे मुक्काम होता. दिंडीतील वारकऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने परंपरेप्रमाणे आमटी- भाकरीचे वाटप करण्यात आले. यावेळी बापूसाहेब मोरे महाराजांचे कीर्तन झाले.


    कार्तिकीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन करून आळंदीकडे दिंड्यांचे प्रस्थान होते. तुकाराम महाराजांचे वंशज सोपानकाका देहूकर महाराज यांची दिंडी अनेक वर्षांची परंपरा जपत गणेशवाडी येथे मुक्कामी असते. ग्रामस्थांच्या वर्गणीतून ज्वारी, बाजरीची भाकरी तसेच तूरडाळीची आमटी बनवण्यात येते. दिंडीतील वारकरी आणि ग्रामस्थांनाही त्याचे वाटप करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्थांच्या वतीने चहापानानंतर दिंडीला भावपूर्वक निरोप देण्यात आला. 


   शिंदेवस्ती येथे दिंडीतील वारकऱ्यांची चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. ग्रामस्थांनी अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे ग्रामस्थ वर्गणीतून गोळा झालेल्या पैशातून ज्वारी, बाजरी विकत आणतात. ज्वारी व बाजरी दळून आणून त्याचे पीठ गावातील प्रत्येक घरी पोहच केले जाते. त्याच्या भाकरी करून त्या मंदिरात आणून देण्याची परंपरा अजूनही कायम आहे. तर मंदिरा जवळील जागेतच तुर दाळीची तरीबाज खमंग आमची ग्रामस्थ एकत्रित बनवतात. वारकऱ्यांच्या जेवणानंतर ग्रामस्थांना प्रसाद म्हणून त्याचे वाटप करण्यात येते.

फोटो - गणेशवाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने दिंडीतील वारकऱ्यांना आमटी भाकरीचा प्रसादाचे वाटप.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा