Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ जुलै, २०२५

*वीज उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून हिरज, तिऱ्हे, पाथरी, शिवणी आदी गावच्या आजुबाजूच्या गावातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू: प्रणिती शिंदे*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज गाव भेट दौऱ्या दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज गावी भेट दिली. गावकऱ्यांचे निवेदने स्वीकारली. यावेळी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी MSEB बाबतच्या तक्रारी सांगितल्या. तसेच त्याचबरोबर वनविभागातील रानडुकरे व हरिणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हिरज ग्रामपंचायतीने वीज उपकेंद्रासाठी गायरान जमिनीचा ठराव दिला आहे. तरी जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेऊन विजेचा प्रश्न सोडवावा. त्याचबरोबर हिरज ते पीरटाकळी हा जो जुना रस्ता नकाशामध्ये उपलब्ध आहे. तोही रस्ता नवीन करून मिळावा. त्याचबरोबर गावामध्ये विविध विकास कामांना निधी द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी याप्रसंगी केली.


यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी टप्प्याटप्प्याने सर्व विकास कामे केली जातील. खासदार या नात्याने तुमची सगळी कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हिरज हद्दीतील गायरान जमीन तिऱ्हे विज उपकेंद्रासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करेन व हिरज तिऱ्हे पाथरी शिवणी आदी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू असे सांगितले. 


याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री भारत जाधव, सरपंच प्रशांत साबळे, माजी सरपंच इलाही पटेल, अमोल सरवदे, संभाजी गावडे, संजय येलगुंडे, मिनाज पटेल, अमोल गावडे, दत्ता वाघमारे, कदीर पठाण, बाळकृष्ण कुलकर्णी, चंद्रकांत तमशेट्टी, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, सचिन गुंड, हनुमंत जावीर, शशिकांत सलवदे, त्याचबरोबर वन खात्याचे अधिकारी गांगर्डे साहेब MSEB चे मुल्ला साहेब , तसेच बांधकाम खात्याचे जिल्हा परिषद चे अभियंता, तलाठी ग्रामसेवक व ईतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा