Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० जून, २०२५

*अकलूज येथे संत श्रेष्ठ गौरव काका कुंभार पायी पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

श्री संत श्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार पायी दिंडी सोहळा आज अकलूज येथे पोहोचला यावेळी अकलूज कुंभार समाजाच्या वतीने कुंभार समाजाचे अध्यक्ष अमित सुरेश कुंभार,संदीप वसंतराव कुंभार,सुधाकर कुंभार, रवी कुंभार ,राहुल कुंभार, विनायक कुंभार,कुंभार समाजातील महिलांनी व नागरिकांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून आश्वाचे पूजन केले व पालखीतील पादुकांचे विविध पूजन करून दिंडी चालकांचा सत्कार केले व प्रसादाचे वाटप करण्यात आले संत गोरोबाकाका पायी दिंडी सोहळा हा राजगड पायथा गुंजवणी येथून गेले वीस वर्षापासून सुरू झाला आहे २० जून रोजी हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.आज अकलूज येथे मुक्काम व पुढे बोरगाव,श्रीपुर,माळखंबी,तोंडली बोडले मार्गे पंढरपूरकडे जाते.या सोहळ्याचे अध्यक्ष तानाजी शिंदे, माणिक आबा टाकळीकर, विणावादक सुरेश रसाळ,चोपदार तुकाराम झांजे,जबाबदार राजाभाऊ कुंभार,बैल मालक बोरकर,घोडे मालक मानकर नारायणपूर त्याचबरोबर पालखी पुढे दोन व पाठीमागे दोन दिंड्या चालत आहेत सुमारे ६०० ते ८०० भाविक या दिंडी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा