*अकलूज----प्रतिनिधी*
*शकुरभाई तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्याचा काल पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम दिनांक 30 जून रोजी सराटी ता.इंदापूर जि.पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामा नंतर आज दिनांक 1 जुलै रोजी पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आणि आज श्री संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम अकलूज येथे असून
याप्रसंगी एक दुःखद घटना घडली असून संत तुकाराम महाराज रथाच्या मागे असलेली "देवराव बुवा हातगावकर 'यांच्या दिंडी क्रमांक 12 मधील एक युवक गोविंद नामदेव फोके ,रा.झिरपी ता.अंबड जि. जालना येथील तरुण संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामी सराटी ता. इंदापूर येथे असलेल्या नीरा नदीच्या पात्रात आज सकाळी 1 जुलै रोजीआंघोळीसाठी नीरा नदीत गेला असता नदीपात्राच्या पाण्यात बुडाला असल्याचे समजते, शोध कार्य चालू असून अद्याप तो मिळुन आला नसल्याचे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा