Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ जुलै, २०२५

*मोहम्मद पैगंबर यांच्या आज्ञा न पाळल्याने मुस्लिम हा जगात दुर्लक्षित आणि पीछेहाट*

 


*इकबाल बाबा साहेब मुल्ला--- सांगली (पत्रकार )*

*मो:--8983 587 160


*आजचा मुस्लिम !*

"रद्दी" पेपरच्या भावात कोण "विकले" जातं आहे ?? ज्यांनी *जगात* राज्य केले त्यांना आज काय किंमत आहे ?? *आत्मसन्मान* आणि अभिमान याचा आणि *मुस्लिमांचा* सध्याच्या काळात काही "संबंध" उरला आहे का ??? *राजकीय* पक्षांमध्ये मध्ये मुस्लिमांच्या *14% च्या लोकसंख्येनुसार* "प्रतिनिधित्व" मिळते का ?? तुमचे किती "आमदार" आणि किती *खासदार* आहेत ?? तुमचे भारतात किती IAS आणि IPS अधिकारी / *जिल्हाधिकारी* / पोलीस अधीक्षक/प्रशासकीय सेवेत आहेत ?? कोणत्या राजकीय पक्षात मुस्लिमांना सर्वाधिक *वाटा* मिळतो?? भारतामध्ये मुस्लिमांचा *वाली* कोण ?? महाराष्ट्रात तसेच भारतातील मुस्लिमांचा *स्वाभिमान* *जिवंत* आहे का ??

राणे - पडळकर - जगताप असो वा अन्य ! मुस्लिमांच्या नावाचा *बोभाटा* करत, "अल्पसंख्यांक"- ख्रिश्चन समाजावर *आगपाखड* केली जाते. त्यांना "जाब" विचारणारा कोणी *मर्द* आहे का?? भारतात नव्हे तर जगात कोणत्याही *मंदिरात* मुस्लिमांनी तोडफोड केली - नुकसान केले - *विटंबना* केली याची उदाहरणे नाहीत. हिंदू मुस्लिम *भाई -भाई* आहेत मग मुस्लिमांच्या नावाने नेहमीचं "षडयंत्र" का रचली जातात ?? *शिवजयंती* मुस्लिम साजरी करतात ,*हिंदूंच्या* "सणांमध्ये " ते सहभागी होतात मग मुस्लिमांबद्दल हा *तिरस्कार* का ?? "राजकारणासाठी" केवळ मुस्लिमांना आरोपी च्या *पिंजऱ्यात* का उभे केले जाते ?? मुस्लिमांना *व्हिलन* का ठरवले जाते ??

 *अन्यायाबद्दल* जाब विचारण्याची "हिम्मत", का होतं नाही ?? मुस्लिमांना कुणाची *भीती* आहे ??

हजरत *टिपू सुलतान* आणि "बहाद्दूर शहा जफर" यांच्यासारखे "क्रांतिकारक" एकदाच होतात. पण आजच्या 21 व्या शतकात त्यांच्या पाऊलावर "पाऊल" टाकत होणाऱ्या "अत्याचार" आणि अन्यायाबद्दल कोणाला *सोयरसुतक* का वाटतं नाही ?? नरो वा कुंजरो या प्रमाणे दुसऱ्याचं "मढ" ..आपण का "रडं" ..असं प्रत्येक मुस्लिम का समजतो ??

मुस्लिमांच्या या *दळभद्री* परिस्थितीला कारणीभूत कोण ??? "*इराणने* आज *इस्राईल* ला चारीमुंड्या *चितपट* केले,उध्वस्त केले. पण 80 लाख लोकसंख्येचा इस्राईल *50 मुस्लिम देशांना* का "भारी" पडला होता?? त्यांच्या यशाचे *गुपित* काय आहे ?? आज मुस्लिम कोठे आहे ,आणि आपण कोठे आहोत ?? (माझ्यासह) प्रत्येक मुस्लिमांनी स्वतःमध्ये *शोध* घ्यावा, स्वतःला *आरशात* निरखावे, आत्मचिंतन करावे ! 

  *प्रेषित मोहंमद पैगंबरांचा विसर !*

जे मुस्लिमांनी सोडले ते *यहुदींनी* उचलले, आत्मसात केले. आपण दुसऱ्याला "दोष" का द्यावा?? इकरा ..हा पाहिला शब्द आहे. *इकरा* म्हणजे शिक्षण ! प्रेषितांनी सर्व मुस्लिमांना *शिक्षण* शिकण्यासाठी बजावले आहे. शिक्षणातून प्रगती - उन्नती होते या दृष्टीकोनातून संपूर्ण *कुटुंब* स्थिरस्थावर होते. आज किती मुस्लिम *शिक्षण* घेत आहेत ?? 1 ली ते 10 वी पर्यंत नव्हे तर 10 वी नंतर किती टक्के विध्यार्थी हे *पदवीधर* होतात ???

याचे ठोकळ उत्तर असे आहे 100% मध्ये केवळ *15 %* मुस्लिम हे पदवीधर होतात. मग बाकीच्यांचे काय ?? *रद्दी /भंगार/गॅरेज/ पानपट्टी/रिक्षा/भाजी/फळविक्री*/अवैध व्यवसाय/ अशा व्यवसायात मुस्लिमांचे प्रमाण भयानक आहे. 10 वीच्या पुढील शिक्षण ते न घेतल्याने त्यांना हा "व्यवसाय" नाईलाजाने करावा लागत आहे. ते पदवीधर होतं नाही आणि त्यांच्या *मुलांना* देखील ते पदवीधर बनवत नाहीत. 

दुसरा मुद्दा म्हणजे, मुस्लिम समाजात *एकमेकांना* मदत न करणे,सुखदुःखात सहभागी न होणे यामुळे अनेक कुटुंबे "दारिद्र्यरेषेखाली" आहेत. *सिंधी - गुजराती - मारवाडी - पंजाबी* या समाजात युवकांना व्यवसाय करण्यासाठी *बिनव्याजी कर्ज* दिले, उद्योजक बनवले जाते. तशी *सिस्टीम* मुस्लिम समाजात का नाही ?? शिक्षण असेल तर "उद्योजक" बनता येते. उत्पादक बनता येते. मुस्लिम समाजात शिक्षण नाही ,*उद्योजक* नाहीत, संस्कारक्षम घरातील सदस्य नाहीत त्यामुळे मुस्लिमांची प्रगती "खुंटत" आहे.

🔴 *इस्राईल-यहुदी च्या यशाचे गमक केवळ शिक्षण - एकमेकांना मदत आणि मोहंमद पैगंबर यांची शिकवण हे होय !*

इस्राईल मध्ये *90% श्रीमंती* आहे. मुस्लिमांनी "विसर" पडलेला प्रेषितांचे संस्कार -शिक्षण इस्राईलने आत्मसात केले आहेत. "यहुदी" नेहमीच एकमेकांच्या सम्पर्कात असतात.एकमेकांना मदत करणे - सर्वांगीण शिक्षण घेणे - "कामगार" न बनता *उद्योजक* बनणे आणि इतर प्रेषितांचे "आदर्श विचार" इस्राईलने अवलंबले आहे.

आज केवळ प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या आदर्श विचारधारेचा विसर पडल्यानेच मुस्लिमांची *पीछेहाट* झाली आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये.


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा