अकलूज---- प्रतिनिधी
केदार --लोहकरे ,
टाइम्स 45 न्यूज मराठी.
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे भारत सरकार व्यवहार विभाग व नाफेड यांच्या माध्यमातून शिवरत्न फाउंडेशन डॉटर्स मॉम फाउंडेशन,भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार आरोग्यदूत राम सातपुते तसेच धैर्यशील मोहिते पाटील संघटक सरचिटणीस सोलापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाने दिवाळीनिमित्त एका आधार कार्डवर ५ किलो ६० रुपये किलो दराप्रमाणे सवलतीच्या दरात हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.माळशिरस तालुक्यातील माळशिरस, वेळापूर,खंडाळी,अकलूज,गोरडवाडी पिलीव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवाळी सणानिमित्त भारत डाळ योजनेअंतर्गत भव्य प्रमाणात डाळ वाटप करण्यात आली.तांदुळवाडी येथे या डाळ वाटपाचा शुभारंभ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक ॲड. विजय नामदेव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी रत्नप्रभादेवी बीजोत्पादक सहकारी संघाचे संचालक बाबासाहेब पाटील,विलास पाटील,रामकृष्ण दुधाट,प्रमोद निंबाळकर,शिवाजी कदम,शिवाजी चव्हाण,बापू राजगुडे,दादा बाबर,तानाजी कदम,भास्कर केदार,अमोल राऊत,आरिफ मुलाणी,पत्रकार डी एस गायकवाड आदी मान्यवर बंधूसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
भाजपाचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील व डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी योजना आणून सर्वसामान्यांना एक वेगळा पायंडा पाडला आहे.त्याच धर्तीवर दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर बऱ्याच गावात हरभरा डाळ वाटप करण्यात आली आहे तळागाळातील लोकांपर्यंत हरभरा डाळ पोचली पाहीजे असे आवाहन धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले होते.यामुळे सर्वसामान्यात आनंदाचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा