Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

बावडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रणजित घोगरे यांची निवड.

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                            - बावडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रणजित अशोकराव घोगरे यांची मतदानाद्वारे निवड करण्यात आली, ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पल्लवी रणजीत गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसचिवालयात उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी मल्लाप्पा ढाणे यांनी कामकाज पाहिले.

     बावडा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत काळेश्वर ग्रामविकास पॅनलचे रणजित अशोकराव घोगरे यांना १३, तर विरोधी पद्मावती ग्रामविकास परीवर्तन पॅनलचे विक्रमसिंह तुकाराम घोगरे यांना ५ मते मिळाली. त्यामुळे रणजित घोगरे यांची उपसरपंचपदी निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मल्लाप्पा ढाणे यांनी केली. यावेळी सचिव म्हणून अंबिका पावशे यांनी काम पाहिले. निवडीनंतर सभागृहात नुतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. तर मावळते सरपंच किरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

   यावेळी सरपंच पल्लवी गिरमे, नूतन उपसरपंच रणजित घोगरे यांनी मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अशोक घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकासासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही दिली. यावेळी अशोकराव घोगरे, उदयसिंह पाटील, महादेव घाडगे यांनीही मनोगते व्यक्त केली. आभार सदस्या सुप्रिया कांबळे यांनी मानले. उदयसिंह पाटील, अमरसिंह पाटील, मनोज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा