इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
टाइम्स 45 न्युज मराठी.
मोबाईल-8378081147
, "साद फाउंडेशन, इंदापूर" ( चॅरिटेबल ट्रस्ट) या एनजीओच्या माध्यमातून व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांच्या कल्पनेतून प्रथमच भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ भारतीय संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी, भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, युवा पिढीमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी, लोकशाही बळकट काढण्यासाठी, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे दर्शन घडवण्यासाठी, न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता या संविधानिक मुल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, संविधान सन्मान दौडचे आयोजन केले आहे.
या दौड ची सुरुवात वालचंद नगर येथील जुने बस स्थानक नवे बस स्थानक परत जुने बस स्थानक, वालचंद नगर अशी दौड होणार असल्याची माहिती- साद फाउंडेशन- चे संस्थापक अध्यक्ष सुरज भैय्या वनसाळे यांनी दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा