इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- "देवा नरसिंहा सरकार, खाजगी दुध संघ वाल्यांना सुबुद्धी दे, दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ देवून संकटातून बाहेर काढ" असे साकडे शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दिपक आण्णा काटे यांनी श्री लक्ष्मी नृसिंह चरणी दुग्धाभिषेक घालून घातले.
शिवधर्म फाउंडेशन व शेतकरी संघटनेच्या वतीने नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह चरणी दुग्धाभिषेक तसेच पिंपरी बुद्रुक येथील विठ्ठल रूक्मिणी व महादेवास दुग्धाभिषेक घालून मंदिरात दुधदर जनजागृती आंदोलनास जमलेल्या नागरिकां समोर दिपक काटे बोलत होते. यावेळी किशोर खटके, माऊली वनवे, विकी निंबाळकर, किरण वाघमोडे, निलेश बोडके, दिलीप बोडके, युवराज बोडके, बंटी काटकर, सतीश बोडके, राजू बोडके, दत्तात्रय घोगरे, ज्ञानेश्वर बोडके, अजिनाथ बोडके, कल्याण भंडलकर, भरत सुतार, हनुमंत सुतार, सुधाकर घोगरे, शामराव पडळकर आदिजण उपस्थित होते.
दिपक काटे पुढे म्हणाले, शासन परीपत्रकात ३४ रूपये दर असताना मात्र खाजगी दुध संघवाले २६ रूपये दर देत आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारकरी, शेतकरी व धारकरी असून आमच्यावर अन्याय करणाऱ्या विरोधात हक्काची लढाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. ह्या युध्दात वैचारिक व संविधानीक लढाई लढून जिंकायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न नव्वद टक्के दुधसंघ असून हॅथसनला दुधदर परवडतो मग तालुक्यातील दोन खाजगी दुध संघांना का परवडत नाही. आगामी तीन ते चार महिने दुधाची दरवाढ होणार नसल्याने दुध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्यासाठी जागृत होऊन लढ्यात उतरा त्याची सुरुवात शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून इंदापूरातून होणार असून त्याचे लोन राज्यभर पसरणार असल्याने त्याची दिशा व दशा पहायला मिळेल असे शेवटी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात माऊली वनवे, किरण वाघमोडे, हनुमंत सुतार यांची भाषणे झाली. सुत्रसंचलन व प्रास्ताविक युवराज बोडके यांनी तर आभार दिलीप बोडके यांनी मानले. इंदापूर तालुका जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलनाला तालुकाध्यक्ष कल्याण भंडलकर यांनी पाठिंबा जाहीर केला.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथे महादेवाच्या पिंडीवर दुग्धाअभिषेक करून मार्गदर्शन करताना दिपक काटे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा