निमगाव(म)----प्रतिनिधी
रामभाऊ मगर
टाइम्स 45 न्युज मराठी.
माळशिरस तालुक्यातील "ओंकार साखर कारखाना" युनिट एक -चांदापुरी- चा ऊसाचा पहिला हाप्ता २७०० रूपये शेतकऱ्यांच्या व वाहनधारकांचे तोङणी व वाहतुकीचे पैसे खात्यावर जमा करून गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी शेतकऱ्यांना दिलेला शब्द कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी पाळला आहे.
याप्रसंगी बोलताना चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराची ची ऊस दरा बाबत कोणाशी स्पर्धा नसुन कष्टकरी शेतकरी व माहिला महागाई च्या काळात जेवढा शक्य आहे तेवढा बाजार भाव देऊन शेतकऱ्यांचे हित जपण्याचे प्रयत्न ओंकार परिवार करेल आशी ग्वाही त्यांनी दिली ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार कामगार पुढील काळात वेळेत पैसे दिले जातील तरी शेतकऱ्यांनी ओंकार साखर कारखान्याला ऊस घालावा असे आवाहन बोञे पाटील यांनी केले
या वेळी संचालक प्रशांत बोञे पाटील जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन मॅनेजर शरद देवकर चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते रमेश आवताङे सुरक्षा आधिकारी मोहन घोङके विष्णु गोरे गणेश शितोळे संतोष काळे गणेश धायगुङे यासह आधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा