Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

राज्यातील संगणक परीचालकांच्या मागण्या संदर्भात लवकरच मंत्रालयात स्वतंत्र बैठक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                             - राज्यातील संगणक परीचालकांच्या मागण्या संदर्भातील विषयांची पूर्ण माहित असून यासाठी लवकरच मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावून निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देणाऱ्या संघटनेच्या सदस्यांना आश्वासन दिले.

   नीरा नरसिंहपूर येथे कुलदैवताच्या दर्शनास देवेंद्र फडणवीस आले असता संगणक परीचालकांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांसाठी १७ नोव्हेंबर पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

     उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पूर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील १२ वर्षापासुन ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक काम करत आहेत. ग्रामपंचायतचे ऑनलाईन व ऑफलाईनची अनेक प्रकारची कामे करून सुद्धा ६९३० रुपये महागाईच्या काळात तुटपुंजे मानधन मिळते. संगणक परिचालक ग्रामपंचायतीचे कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. यावलकर समितीने संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात पदनिर्मिती करण्याची शिफारस केली आहे, ग्रामपंचायत स्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर सगणक परिचालक पदाची कायमस्वरूपी निर्मिती करून किमान वेतन देणे आवश्यक आहे, त्यासाठी शासन स्तरावर राज्य संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे, परंतू शासन व प्रशासन वेळकाढूपणा करत आहे.

     ग्रामपंचायत स्तरावर काम करणा-या कर्मचाऱ्याना किमान वेतन व मानधन वाढ झाली आहे, परंतु शासनाने संगणक परिचालकांचे मानधन वाढ न केल्याने त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. तसेच ग्रामविकास विभागाने नव्याने लोकसंख्या निहाय टार्गेट ची पद्धत सुरू केली आहे, त्यासाठी संगणक परिचालकांवर दबाव टाकला जात आहे. अशा प्रकारच्या मागण्यांसाठी १७ नोव्हेंबर पासुन राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

     यासाठी राज्याध्यक्ष सिध्देश्वर मुंडेच्या मार्गदर्शनाखाली पुणे व सोलापुर जिल्हा संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नीरा नरसिंहपूर येथे भेट घेवून निवेदन देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बोडके सर, इंदापूर तालुका उपाध्यक्ष सचिन चव्हाण, सोलापुर जिल्हाध्यक्ष सोमनाथ नवगिरे उपस्थित होते. 

फोटो - नीरा नरसिंहपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना स़घटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा