इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- बहुसंख्य लोकसंख्या गावामध्ये राहत असल्याने केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागाद्वारे शाश्वत विकास ध्येय निश्चितीतून स्थानिक नियोजनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा संकल्प केला असल्याचे प्रतिपादन विस्तार अधिकारी युन्नूस शेख यांनी केले
पिंपरी बुद्रुक येथे लाखेवाडी पंचायत समिती गणातील 'आमचं गाव आमचा विकास (GPDP) उपक्रमातंर्गत (दि.२३ व २४) रोजी गणस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये उपसरपंच, सदस्य, ग्रामसंघ अध्यक्ष, आशासेविका, अंगणवाडी सेविका, गावपातळीवरील सर्व विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
ग्रामपंचायतीचा सन २०२४/२५चा १५ वा वितआयोगाचा वार्षिक आराखडा तयार करणे करीता लाखेवाडी गणातील गणस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य, शिक्षण, उपजिविका, महिला व बालकल्याण व अनु. जातीचे उन्नतीकरीता लोकसंख्येच्या प्रमाणात खर्चाबाबत माहिती देण्यात आली.
लाखेवाडी गणाचे प्रभारी अधिकारी तथा विस्तार अधिकारी युनुस शेख, यांनी जीपीडीपी कार्यक्रमाची रुपरेषा, शाश्वत विकासाची ध्येय तसेच गरीबी मुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गांव, जलसमृद्ध गांव हरीत गांव, पायाभूत सुविधायुक्त गाव, सामाजिक न्याय व सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, महिला स्नेही गाव या नऊ संकल्पना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेमध्ये सरपंच चित्रा ढोले, उपसरपंच संतोष सुतार, दादासो क्षिरसागर, राजेंद्र भोसले, वर्धमान बोडके, पांडुरंग बोडके, ग्रामसेवक गणेश लंबाते, सागर सवासे, नवनाथ नरूटे, आशासेविका, अंगणवाडी सेविका आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार गणेश लंबाते यांनी मानले.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथे 'आमचं गाव आमचा विकास (GPDP) उपक्रमातंर्गत गणस्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना युन्नूस शेख.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा