Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

माळशिरस तालुक्यात ९जिल्हात९६जणावरसावकारी गुन्हे दाखल.

 


अकलूज(प्रतिनिधी) लक्ष्मीकांत कुरुडकर.

                                 सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक बँका, पतसंस्था असे विविध कर्ज घेण्याचे स्त्रोत असताना अनेकजण सावकारांकडून जास्तीच्या टक्केवारीने कर्ज घेतात आणि ते फेडणे होत नसल्याने इस्टेटी गमावून बसतात. २०२३ मध्येही असेच अनेकजण सावकारी कचाट्यात सापडले होते, अडचणीत आल्यानंतर जवळपास १३६० जणांनी जिल्हा निबंधकांकडे तक्रारी दाखल केल्या असून, त्यातील ८६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा म उपनिबंधक किरण देशमुख यांच्याकडून मिळाली.

ग्रामीण भागासह आता शहरी भागातही या गुन्ह्यांच्या तक्रारी जास्तच वाढू लागल्याने या कार्यालयाकडून कडक कारवाई करण्यात येवू लागली आहे. यावर्षी सोलापूर शहरात २६ गुन्हे दाखल झाले आहेत. द. सोलापूर तालुक्यात २ मोहोळ २, पंढरपूर-७, अक्कलकोट ९, सांगोला २, माळशिरस ९, करम ाळा १०, मंगळवेढा ८, बार्शी ६, माढा ५ असे ८६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर आजतागायत १३६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १३०१ अर्जाची चौकशी झाली आहे. यातील ८६ जणांवर गुन्हे दाखल झाले तर १६५ दावे सध्या चालू आहेत. याची सुनावणी रोजच चालू असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा