इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- महाराष्ट्राच्या भल्यासाठी नेहमीच श्री लक्ष्मी नृसिंहाचा आशीर्वाद घेण्यासाठी व दर्शनासाठी येत असतो. दर्शन घेतल्याने काम करण्यासाठीची प्रेरणा व उर्जा मिळते. मागील अनेक दिवसांपासून येता आले नाही. त्यामुळे आज कार्तिकी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल महापुजा करण्याचा व कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेण्याचा योग आला असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी काढले.
नीरा नरसिंहपूर येथे कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त पत्नीसह कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अमृता फडणवीस, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, जयकुमार गोरे, धैर्यशील मोहिते पाटील, सरपंच अर्चना नितीन सरवदे, उपसरपंच रेणूका काकडे, उदयसिंह पाटील, सहाय्यक संचालक विलास वाहने, प्रांताधिकारी वैभव नावाडकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर आरगडे, विश्वस्त प्रशांत सुरू आदिंसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक, नागरीक उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यातील तिर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान फडणवीस कुटुंबियांचे कुलदैवत आहे. वर्षातून एकदा तरी फडणवीस कुटुंबिय दर्शनासाठी येत असतात. आज कार्तिक शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील शासकीय महापूजा उरकून हेलीकाॅफ्टरने नरसिंहपूर आले. येथे कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंह देवाची सपत्नीक पुजा केली व आशिर्वाद घेतले. पौराहित्य कमलेश डिंगरे, श्रीराम डिंगरे, प्रसाद दंडवते आदिंनी केले.
फोटो - नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा