Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

बावडा ग्रामपंचायतवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सत्ता कायम, भाजपा १२ तर राष्ट्रवादी काँग्रेस ५ जागेवर विजयी, सरपंच पदावर पल्लवी गिरमे १४३२ मतांनी विजयी,

 


ग्रामपंचायत रणधुमाळी

निवडणूक रणनीतीकार

टाईम्स 45 न्युज नेटवर्क

                           - बावडा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या सौ. पल्लवी रणजीत गिरमे यांनी १४३२ चे मताधिक्य घेत सरपंच पद पटकावले. तर १७ जागेपैकी १२ जागा घेत ग्रामपंचायतवर सत्ता अबाधित ठेवण्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना यश आले आहे. तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूकीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.


     बावडा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सहा वार्डातील १७ जागेसाठी काल (दि.५) मतदान घेण्यात आले होते. आज जाहीर झालेल्या निकालात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित काळेश्वर ग्रामविकास पॅनलने १७ पैकी १२ जागा जिंकत सत्ता कायम ठेवण्यात यश संपादन केले. तर सरपंच पदावर सौ. पल्लवी रणजीत गिरमे यांनी १४३२ ची आघाडी घेवून विजय संपादन केला. 

  


   माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली शेटफळ तलाव बचाव कृती समितीचे निमंत्रक पंडितराव पाटील व माजी सभापती प्रशांतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पद्मावती ग्रामविकास परीवर्तन पॅनलने १७ पैकी ५ जागा जिंकल्या आहेत. त्यांनी सरपंच पदासह १७ जागा लढवत कडवी झुंज दिली. मात्र नागरिकांत सत्ताधाऱ्या विरोधात असलेला असंतोष मतदानातून उतरवण्यात कमी पडल्याचे दिसून आले. तर सत्ताधारी मंडळींना शेवट पर्यंत घामाघाम करण्यात मात्र यश आले.

     इंदापूर येथील शासकीय धान्य गोदामात इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी आज घेण्यात आली. त्यासाठी तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, विस्तार अधिकारी युन्नूस शेख यांनी यंत्रणा सज्ज ठेवली होती. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष उडवून दिला. 

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा